परवागनी केंद्र सरकार देत असले तरी,चिपी विमानळ राज्य शासनाचे…

2

दिपक केसरकरांचा पलटवार; चांगल्या कामात विघ्न नको, राणेंचे नाव न घेता टीका…

सावंतवाडी, ता.०८: परवानग्या जरी केंद्र सरकार देत असले तरी,चिपी विमानतळ राज्य शासनाचे आहे.विमान उडणार हा आनंदाचा प्रसंग आहे.त्यात कोणी विघ्न आणण्याचे काम करू नये,असा पलटवार आमदार दिपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता लगावला.

दरम्यान अशा परिस्थितीत सुध्दा केंद्र आणि राज्य सरकार मध्ये भांडणे लावण्याचे काम करणार्‍यांना गणपतीने चांगली बुध्दी द्यावी,आणि त्यांच्या पंतप्रधांनानी सुध्दा त्यांना योग्य त्या सुचना द्याव्यात,असे केसरकर म्हणाले.श्री केसरकर यांनी आज या ठीकाणी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी ते म्हणाले, अनेक वर्षे रखडलेल्या विमानतळावरुन विमान उडणार हे आनंदाची गोष्ट आहे.अशा परिस्थितीत त्याला चांगला प्रतिसाद देणे गरजेचे आहे. मात्र काही लोक केंद्र आणि राज्य सरकार मध्ये भांडणे लावण्याचे काम करीत आहे.अशा लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य त्या सुचना द्याव्यात.

ते पुढे म्हणाले, विमानतळाच्या परवानग्या जरी केंद्राचा विषय असला तरी विमानतळ राज्य शासनाचा आहे. यासाठी गणपतीपुर्वी परवानगी मिळणे गरजेचे होते. मात्र दुदैवाने ती परवानगी मिळाली नाही, असे ते म्हणाले.

440

4