झाराप-पत्रादेवी महामार्गावर नेमळेत टेम्पोला अपघात.

2

बांदा, ता.१६:  झाराप-पत्रादेवी महामार्गावर नेमळे येथे कुडाळहून बांद्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोचा टायर पंक्चर होऊन अपघात झाला. या अपघातात टेम्पोच्या मागाहून येणाऱ्या दोन मोटारी दुभाजकात घुसल्या. मात्र सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. हा अपघात सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास झाला.

2

4