वेंगुर्ले न. प.च्या डंपिग ग्राऊंडला नाशिकमधील अभ्यास गटाची भेट

2

वेंगुर्ला, ता.१६:  वेंगुर्ले नगर परिषदेच्या वेंगुर्ले कॅम्प येथील स्वच्छ भारत पर्यटन स्थळास ( डंपिग ग्राऊंडला) नाशिक येथील ६५ जणाच्या अभ्यास गटाने भेट देवुन माहिती घेतली. डंपिग ग्राऊडचे स्वच्छ भारत पर्यटन स्थळात केलेले रुपान्तर पाहुन अभ्यासकांनी प्रशवसा केली.
नाशिकचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) इशाधिन शेळकंदे, गटविकास अधिकारी भुपेंद्र बेडसे, सहाय्यक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षातील तज्ञ, व नाशिक जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातील गटविकास अधिकारी अशा एकुण ६५ जणांच्या अभ्यास गटाने आज गुरुवारी वेंगुर्ले न. प. च्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळास भेट देवुन पहाणी केली. स्वच्छतेचा वेंगुर्ले पॅटर्न नाशिक जिल्हयात राबविण्यासाठी हा दौरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या सोबत सिंधुदुर्ग जिल्हयाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे उपस्थित होते.
यावेळी वेंगुर्ले न. प. चे मुख्याधिकारी वैभव साबळे, व नगरसेवक प्रशांत आपटे यांनी त्यांना लॅस्टिक क्रशर मशिन, कांडी कोळसा, केरकचऱया पासुन तयार करण्यात येणारे गाडुळ खत, बायोगॅस, स्लरी, वेंगुर्ले शहरात दररोज नागरिकांकडून ओला, सुका असे वर्गिकरण करुन घेण्यात येणारा कचरा, व या वेस्ट पदार्था पासुन बनविण्यात येणाऱ्या विविध वस्तु, रस्ते याविषयी माहिती दिली. यावेळी सागर चौधरी व वेंगुर्ले न. प. चे कर्मचारी उपस्थित होते.

5

4