Monday, January 20, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याराज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना केंद्राची भरीव मदत : राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची सावंतवाडीत...

राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना केंद्राची भरीव मदत : राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची सावंतवाडीत माहिती

सावंतवाडी: केंद्र सरकारने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना भरीव मदत केली आहे. त्यामुळे दुष्काळाची झळ बसणार नाही. यासाठी सरकार पूर्ण क्षमतेने काम करत असून, ११ जूनपर्यंत पाऊस महाराष्ट्रात येईल, अशी भविष्यावाणी मदत व पुर्नवसन राज्यमंत्री मंत्री दिलीप कांबळे यांनी केली सावंतवाडी येथे खासगी कार्यक्रमासाठी आले असता त्यानी अनेक विषयावर दिलखौलास आपली मते माडली.
मंत्री कांबळे म्हणाले, राज्यात मागील निवडणुकीपेक्षा एक जागा किती जास्त येईल तसेच देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल यात कोणतीही शंका नाही. देशातील विरोधी पक्षातील अनेक नेते आपण पंतप्रधान होऊ अशा अपेक्षेने आहेत. मात्र त्यांचे हे स्वप्न स्वप्नच राहील. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे तेरा दिवसात भाजप सरकार कोसळेल, असे सांगत आहेत. त्यामुळे त्यांचीही पंतप्रधानपदासाठी महत्त्वाकांक्षा दिसून येते. त्यामुळेच ते गैरसमज पसरवत आहेत. मात्र, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार देशात स्थापन होईल यात कोणतीही शंका नाही, असे मंत्री कांबळे म्हणाले.
शरद पवार यांना भविष्यातील राजकारणाच्या वाऱ्याची दिशा कळत असते असे बोलले जाते. त्यावरूनच त्यांनी ईव्हीएम मशीनबद्दल संशय व्यक्त केला असेल. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा पराभव होणार हे निश्चित आहे. त्यामुळे या पराभवामागची कारणे अगोदरच शोधून ठेवत आहेत. त्यामुळे मैदान तयार होईल, असा त्यांचा समज आहे. पण पवार यांच्या घरातच ईव्हीएमवरून मतभेद आहेत, असेही मंत्री

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments