नागरिकांचा घेराओ ः नव्याने टायमर बसविण्याची मागणी
मालवण, ता. 16 ः चिवला बिच परिसरातील हायमास्ट टॉवरचा टायमर अज्ञाताकडून चोरून नेल्याचा प्रकार आज येथे घडला. याबाबतची माहिती मिळताच नगरसेवक यतीन खोत यांच्या नेतृत्वाखाली संबंधित कंपनीचे कंत्राट दिलेल्या कंत्राटदाराला जाब विचारण्यात आला व नव्याने टायमर बसविण्याबाबत सुचना देण्यात आली.
परिसरात लावण्यात आलेला दोन हायमास्ट टायमर अज्ञाताकडून चोरीस गेल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे गेले चार-पाच दिवस परिसरात अंधार होता. त्यामुळे नागरिक नाराज होते. हा प्रकार करणार्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होती. त्यानुसार आज एलईडीचे कंत्राट घेणार्या ठेकेदाराला घेराओ घालण्यात आला. यावेळी मोहन वराडकर, विलास मुणगेकर, रुजाय फर्नांडीस, महेश मयेकर, संतोष परब, उदय परब, प्रसन्न मयेकर, कमलेश मयेकर, सागर जाधव, कुणाल खानोलकर, राजा वालावलकर, पिंटू रॉड्रीक्स, जॉन्सन रॉड्रीक्स, गणपत मयेकर आदी उपस्थित होते. यावेळी संबंधित पॉवर बॉक्सला कुलूप करून ठेवा अशा सुचना पालिकेच्या कर्मचार्यांना केल्या.