रेवतळे परिसरातील अनधिकृत बांधकाम पालिकेने हटविले

140
2
Google search engine
Google search engine

मालवण, ता. 16 ः रेवतळे येथील नैसर्गिक पाण्याचा प्रवाह रोखून केलेले बांधकाम आज पालिकेकडून उध्वस्त करण्यात आले. दरम्यान संबंधिताला पुन्हा एकदा समज दिली असून अतिक्रमण हटविण्याचा खर्च त्या व्यक्तीकडून वसूल केला जाणार आहे, असा इशारा नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिला.
रेवतळे सागरी महामार्ग परिसरात त्या ठिकाणी राहत असलेल्या एका व्यक्तीकडून चुकीच्या पद्धतीने बांधकाम करण्यात आले होते. त्यामुळे त्या ठिकाणी नैसर्गिक प्रवाह बदलला होता. गतवर्षी झालेल्या पावसात परिसरात पाणी तुंबले होते. अनेकांच्या घरात ते शिरले होते. त्यावेळी तो अडथळा दूर करण्यात आला होता. परंतू पुन्हा एकदा संबंधिताकडून सिमेंटचे बांधकाम करून त्या ठिकाणी पाणी अडविण्याचा प्रकार झाला होता. परंतू पालिकेकडून आज हे बांधकाम हटविण्यात आले.