ओटवणे वासीयांची पाण्याची इच्छा अखेर पूर्ण |

2

सावंतवाडी : येणार येणार म्हणून गेले काही दिवस प्रतीक्षेत  असलेल्या ओटवणे वासियांची पाण्याची इच्छा पूर्ण झाली  असून तिलारीचे पाणी ओटवण्याच्या शेवटच्या कालव्याला जाऊन मिळाले आहे गुरुवारी सकाळी हे पाणी ओटवणे मांडव फातरकरवाडी येथे असलेल्या कालव्याला जाऊन मिळालयाने ओटवणे वासियांची  गेले अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झाली आहे.ओटवणेत पाणी पोचल्याने गावकरयानी सुटकेचा नि: श्वास सोडला आहे.

गोवा व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या गोवा आंतरराज्य प्रकल्पाचे काम साधारणता १९९० पासून सुरू झाले. त्यानंतर तिलारीचे पाणी दोडामार्ग व सावंतवाडीला मिळावे यासाठी कालवे तयार करण्यात आले होते. अनेक कालव्याची कामेही सन २००० च्या  नंतरच हाती घेण्यात आली होती. सर्व कालव्यांमध्ये गेल्या पंधरा ते वीस वर्षात टप्प्याटप्प्याने पाणी सोडले जाते. ओटवणे येथील कालवे  २००६ मध्ये बांधण्यात आला असून आता तब्बल तेरा वर्षांनी या कालव्यामध्ये पाणी पोहचणार आहे. त्यामुळे गेली अनेक वर्ष पाण्याची प्रतिक्षा होती. ती आता पूर्ण झाली आहे.

मात्र ओटवणेकडे जाणाºया सर्व कालव्यांची डागडूजी करण्यात आली. तसेच टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. जसजसे पाणी पुढे जाते तसतसी कालव्याची पाहाणी करून काय डागडूजी करायची  याची पाहणी प्रत्यक्ष अधिकारी करतात. तिलारीचे पाणी चार दिवसापूर्वी विलवडेला पोहचल्यानंतर या पाण्याचे पूजनही करण्यात आले होते. त्यानंतर लवकरच पाणी ओटवणे गावात पोहचेल, असे सांगण्यात येत होते.त्याप्रमाणे  पाणी सरमळे गावात पोहचेल.  त्या पाण्याची प्रत्यक्ष पाहणी तिलारीचे कार्यकारी अभियंता राकेश धाकतोडे यांनी केली होती  तसेच अधिकाºयांकडून माहितीही त्यांनी घेतली. त्यानंतर आठवड्या पूर्वो या पाण्याने सरमळे सोडून ओटवणेच्या हद्दीत प्रवेश केला होता. या प्रवेशामुळे अनेकांनी सुटकेचा नि: श्वास सोडला असून सरमळेतून मार्गस्थ झालेले पाणी ओटवणेती शेवटच्या कालव्यात तब्बल आठ दिवसानी प्रवेश केला आहे.  हे पाणी ओटवणे मांडवफातरकरवाडीला कालव्यात गुरूवारी सकाळी पोहचेल, असे तिलारी शाखा अभियंता अनिल लाडगे यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द खरा केला                                                                    पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तिलारी चे पानी लवकरच ओटवणेत पोचेल तेथील गावे सुखी होईल यासाठी अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे अधिकारी वर्गाने रात्रंदिवस काम करून पालकमंत्र्यांचा शब्द खरा केला आहे. त्यामुळेच हे पाणी  तिलारी पासून ओटवणे पर्यंत वेळेत पोचू शकले या पाण्याचा फायदा ओटवणे परिसरातील अनेक गावाना होणार आहे.

4