तब्बल २८ वर्षांनी जुन्या आठवणींना उजाळा…
वैभववाडी ता.१७: येथील अर्जुन रावराणे विद्यालयातील सन १९९१ मधील इयत्ता दहावी बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.तब्बल २८ वर्षांनंतर एकत्र आलेल्या वर्ग मित्र-मैत्रिणींनी शिक्षकांच्या उपस्थितीत दहावीच्या वर्गात पुन्हा विद्यार्थी होत जुन्या आठवणींना उजाळा दिला.या स्नेहमेळाव्याला तब्बल ३५ माजी विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होत्या. वर्गशिक्षक जे.एन. परीट यांचा याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच विद्यमान मुख्याध्यापक श्री.नादकर यांचाही विद्यार्थ्यांनी सत्कार केला. या स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थी व विद्यार्थीनीनी मनोगते व्यक्त केली.
सद्यस्थितीत व्यवसाय, नोकरी क्षेत्रात आम्ही स्थिर असलो तरी त्यावेळची घरची आर्थिक परिस्थिती आजही आमच्या डोळ्यासमोर आहे. आई-वडील, पालकांनी अनेक अडचणीवर मात करून आम्हाला शिक्षण दिले. त्यामुळे इथपर्यंत आम्ही पोचलो. याच जाणिवेतून आम्ही गरीब, गरजूंना मदतीचा हात देण्यास सदैव तत्पर असल्याच्या भावना माजी विद्यार्थी विद्यार्थीनींनी व्यक्त केल्या. देवाज्ञा झालेल्या शिक्षक, माजी विद्यार्थ्यांना याप्रसंगी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या मेळाव्याला मुंबई, पुणे व इतर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून माजी विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. यामध्ये हेमलता प्रभुलकर, सुमन रहाटे, हिरा माईणकर, पुनम सावंत, इस्माईल हवालदार, अर्चना तळगांवकर, प्रमोद रावराणे, विनोद रावराणे, विजया खांबल, उत्तम चव्हाण, मनोज गुरखे, राजेंद्र कदम, राजेंद्र तांबे, सुधीर रावराणे, रविंद्र रावराणे, विजया मांजरेकर, वंदना रावराणे, गणपत घवाळी, अंजली माईणकर, विद्या रावराणे, गणपत घवाळी, बस्त्याव पिंटो, प्रिती नाईक, संदीप घाडी, संतोंष पाष्टे, मंगेश घाडी, रविंद्र तांबे, विश्वास जंगम, विलास कदम, संगीता रावराणे, संगीता सावंत, प्रकाश पाटील, यांचा समावेश होता.