गव्याच्या कळपाच्या धडकेत बांद्यातील मोरे कुटुंब जखमी

672
2

नेमळे येथील घटना : झाराप-पत्रादेवी महामार्गावर घडला प्रकार

सावंतवाडी, ता. 17 ः झाराप-पत्रादेवी महामार्गावर गव्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज तीन गव्याच्या कळपाने कारला धडक दिल्यामुळे कारमधील प्रवासी बांदा येथील तिघेजण जखमी झाले. हा प्रकार आज सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास नेमळे-एरंडकवाडी येथे घडला आहे. जखमींना अधिक उपचारासाठी सावंतवाडी रुग्णालयाकडे आणण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.
नरेंद्र डोंगर परिसरात स्थिरावलेला गव्यांचा कळप सावंतवाडी शहरासह मळगाव-नेमळे परिसरात फिरत आहे. चार ते पाच दिवसापूर्वी नरेंद्र डोंगर परिसरातील एका इमारतीच्या शौचालयात गवारेडा कोसळला होता. तर गुरूवारी हायवे परिसरात एका गव्याचा अपघाती मृत्यू झाला होता. आज मात्र वेगळीच परिस्थिती घडली. रस्ता पार करणार्‍या तीन गव्यांच्या कळपाची मोटार कारला धडक बसली. यात बांदा येथील मोरे कुटुंब जखमी झाले आहे.

4