बीएसएनएलची सेवा न सुधारल्यास आंदोलन : संदेश पारकर यांचा इशारा

172
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.17 ः बीएसएनएलची केबल वारंवार तुटत असल्याने लॅण्डलाईन आणि इंटरनेट सेवा कोलमडत आहे. हे प्रकार थांबल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा भाजप युवा नेते संदेश पारकर यांनी आज बीएसएनएल अधिकार्‍यांना दिला. तर खोदाईचे काम करण्यापूर्वी आम्हाला कल्पना द्या असे महामार्ग ठेकेदाराला वारंवार सांगण्यात आलेय. मात्र खोदाईचे काम करताना कधीच कळविले जात नाही. मध्यरात्री कामाला सुरवात करतात आणि केबल तोडून टाकतात त्यामुळे बीएसएनएलची सेवा कोलमडत असल्याची माहिती बीएसएनएल अधिकार्‍यांनी दिली.
येथील बीएसएनएलच्या कार्यालयाला संदेश पारकर यांच्यासह भाजप पदाधिकार्‍यांनी घेराओ घालून अधिकार्‍यांना जाब विचारला. यावेळी तालुकाध्यक्ष संदेश सावंत-पटेल, रमेश पावसकर, भालचंद्र दळवी, बाबू आचरेकर, श्रीपाद सापळे, राकेश वालावलकर, वैभव मालंडकर, कृष्णा केणी, बाबूल शेख आदी उपस्थित होते. या आंदोलनकर्त्यांशी बीएसएनएलचे मंडल अभियंता व्ही. एम. देवळीकर, उपमंडळ अभियंता एस.आर. भिसे यांनी चर्चा केली. बीएसएनएल आणि महामार्ग प्राधिकरण यांच्यात समन्वय नसल्याचे लक्षात आल्यानंतर संदेश पारकर यांनी दूरध्वनीवरून महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी यांच्याशी चर्चा केली. यावेळी श्री.बनगोसावी यांनी यापुढे चौपदरीकरणाचे काम करण्यापूर्वी बीएसएनएल अधिकार्‍यांशी संपर्क साधला जाईल अशी ग्वाही दिली.

\