आडेलीतील संगीत भजन स्पर्धेत नेमळेतील ब्राह्मण प्रासादिक मंडळ प्रथम

291
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले, ता. १८ : वेंगुर्ले तालुक्यातील आडेली येथील श्री दत्तप्रसाद कला क्रीडा मंडळ गोपीनाथवाडी आयोजित आमंत्रित संगीत भजन स्पर्धेत श्री ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ नेमळे (बुवा निळकंठ राऊळ) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
आडेली येथे आयोजित केलेल्या या एक दिवसीय आमंत्रित संगीत भजन स्पर्धेत एकूण दहा संघांनी सहभाग घेतला होता. भजन स्पर्धेचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
या स्पर्धेत द्वितीय क्रमांक श्री सनामदेव प्रासादिक भजन मंडळ सांगेली, सावंतवाडी (बुवा खेमराज सनाम), तृतीय क्रमांक स्वर साधना संगीत भजन मंडळ डिगस कुडाळ (बुवा गौरेश चव्हाण) तर उत्तेजनार्थ श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ श्रावण, मालवण (बुवा विश्राम घाडी) यांना देण्यात आला. तर या स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिक उत्कृष्ट गायक ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ तळवडे (बुवा विशाल वराडकर), उत्कृष्ट पखवाज वादक सिद्धपुरुष प्रासादिक भजन मंडळ मुणगे कुडाळ (तुषार नागडे), उत्कृष्ट चकवा श्री ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ तळवडे (मानसी वराडकर) यांना देण्यात आला. तर उत्कृष्ट कोरस रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ तेंडोली यांना देण्यात आले. या स्पधेर्चे परीक्षण प्रफुल्ल रेवंडकर (संगीत विशारद) व महेश सावंत (पखवाज अलंकार) यांनी केले. स्पर्धेचा परिसरातील भजन प्रेमींनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री दत्तप्रसाद कला क्रीडा मंडळांच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

\