ज्ञानदर्शी शिक्षक पुरस्कार चेतन बोडेकर यांना प्राप्त

216
2
Google search engine
Google search engine

वैभववाडी, ता.१८: बा.रा. कदम गुरुजी ज्ञानदर्शी शिक्षक पुरस्कार वैभववाडीचे प्राथमिक शिक्षक चेतन अंबाजी बोडेकर यांना प्राप्त झाला आहे. उपक्रमशील शिक्षक श्री बोडेकर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
श्री. चेतन बोडेकर हे अचिर्णे गावचे सुपुत्र आहेत. तालुक्यात गेली पंधरा वर्षे प्राथमिक शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. सलग दहा वर्ष ते विद्या मंदिर लोरे मांजलकरवाडी प्रशालेत कार्यरत आहेत. प्रशालेत त्यांनी हसत खेळत इंग्रजी उपक्रम, इंग्रजी स्पिकींग प्रोग्रॅम केंद्रस्तरीय उपक्रम यात त्यांनी चांगल्या प्रकारे काम पाहिले आहे. शैक्षणिक उठावातून डिजिटल शाळा, सुंदर शाळा व शालोपयोगी साहित्य खरेदी यामध्ये त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. तसेच विविध शालेय नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. जिल्हास्तरीय कृती संशोधन सादर करणे, तेजस उपक्रम आदी  उपक्रमात ते काम करत आहेत. क्रीडा, शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षेत प्रशालेतील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे यामध्ये श्री चेतन बोडेकर यांचे मोठे योगदान आहे. कदम गुरुजी ज्ञानदर्शी पुरस्कार समितीने त्यांना पुरस्कार देऊन खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याला बळ देण्याचे काम केले आहे. या पुरस्कारासाठी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांमधून प्रस्ताव मागविण्यात आले होते. नामांकनासाठी प्राथमिक व माध्यमिक मधून प्रत्येकी तीन शिक्षकांची निवड करण्यात आली होती. प्राथमिक मधून अंतिम विजेते चेतन बोडेकर असल्याची घोषणा समिती कडून करण्यात आली. कासार्डे येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.  यावेळी समितीचे अध्यक्ष विनोद मिरगुले, जेष्ठ साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे, संस्थापक डॉ. संदीप कदम, जनार्दन नारकर, ए.एच. मुल्ला, राजेश कदम, शंकर जाधव, अंकुश कदम व निवड समिती सदस्य उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त शिक्षक चेतन बोडेकर यांचे वैभववाडी गटशिक्षणाधिकारी मारुती थिटे,  विस्तार अधिकारी मुकुंद शिनगारे, केंद्रप्रमुख गौतम तांबे, केंद्रातील सर्व शिक्षक, शिक्षण प्रेमी, शा. व्य. समिती, सरपंच, शिक्षक संघटना, माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांच्या मधून अभिनंदन होत आहे.