वैभववाडी ता.१८: नानिवडे येथील शिवसेना व स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांशी प्रेरीत होऊन नुकतेच पक्षाचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली तरुण युवकांनी मोठ्या संख्येने प्रवेश केला.
नानिवडे गावातील गावकऱ्यांच्या श्रमदानाने तयार होत असलेला नानिवडे ते केळवली जोडरस्त्याची उपरकर यांनी प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली. खूप दिवसापासून काही कारणास्तव प्रलंबित असलेल्या रस्त्याबाबत सदर प्रकरणाची प्रांत अधिकारी व गावकऱ्यांची संयुक्त बैठक लावून त्यावर तोडगा काढून योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यांनतर गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन ग्रामदैवत एकविरा देवीच्या मंदिराला भेट दिली.
यावेळी तालुका अध्यक्ष सचिन तावडे, उपजिल्हाध्यक्ष दयानंद मेस्त्री, संपर्क अध्यक्ष चंद्रशेखर सावंत, उपतालुका प्रमुख दीपक पोर्टे, तिथवली विभागीय अध्यक्ष मधुकर खाडये, मनविसे तालुका अध्यक्ष रूपेश वारंग, उपविभागीय अध्यक्ष विशाल हरयाण(जोगेश्वरी-मुंबई) सहसंपर्क अध्यक्ष विवेक कुडतरकर, विद्यार्थी सेना तालुका सचिव ज्ञानेश्वर मोरे, सुशांत हरयान, उपशाखा अध्यक्ष (जोगेश्वरी,पूर्व- मुंबई),रामचंद्र(बंड्या)हरयाण, प्रशांत खाड्ये, पंढरी हरयाण, स्वप्नील हरयाण, गौरव बेळेकर, अमोल खाडये, संतोष खाड्ये, सदानंद मांडवकर, रविन्द्र मांडवकर, अमोल कानडे, रोहीत खाडये, सुनिल महाडीक, केशव मांडवकर, वसंत कुळये, आत्माराम कोकाटे, जगन्नाथ कोकाटे, वसंत कोकाटे, प्रभाकर कोकाटे, गणेश कोकाटे, प्रदिप खाडये, प्रभाकर खाडये, विजय खाडेय,अक्षय खाड्ये, मंगेश मांडवकर, संदिप मांडवकर आदी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.