पेंडूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी शिवसेनेचे प्रमोद शिरोडकर…

631
2
Google search engine
Google search engine

 

वेंगुर्ले ता.१८: तालुक्यातील पेंडूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी शिवसेनेचे प्रमोद शिरोडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.पेंडूर ग्रामपंचायत उपसरपंच महेंद्र नाईक यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या उपसरपंच पदासाठी आज निवडणूक झाली.या निवडणुकीत शिवसेनेचे प्रमोद शिरोडकर यांची उपसरपंचपदी बिंनविरीध निवड करण्यात आली आहे.
या निवडी नंतर जिल्हा परिषद सदस्य नितीन शिरोडकर यांनी पुष्पहार घालून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी सरपंच गीतांजली कांबळी, सामाजिक कार्यकर्ते नितीन मांजरेकर, शिवसेना उपतालुका प्रमूख शशी परब, उदय मोरजकर, निलेश वैद्य, महेश नाईक, अमोल वरकुटे, श्याम गावडे, रवी नाईक, काका नेमन, सविता वैद्य, सत्यवान वैद्य, रितेश गावडे, अण्णा मांजरेकर, अमोल वरकुटे, उदय वैद्य, घनश्याम नेमन, श्याम शिरोडकर, सुशांत शिरोडकर, उदय वस्त, जगन्नाथ गावडे, रमेश कांबळे, प्रेमानंद तांडेल, रवी गावडे आदी उपस्थित होते.
गावाच्या विकासासाठी आपण पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हा प्रमुख तथा आमदार वैभव नाईक व जिल्या परिषद आणि पचायत समिती यांच्या सहकार्याने गावाचा विकास साधणार असल्याचे शिरोडकर यांनी सांगितले. तर माजी उपसरपंच महेद्र नाईक यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या कार्याबद्दल त्यांचे सत्कार करण्यात आला.