सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या योजनांचा सर्वांनी फायदा घ्यावा : सतिश सावंत 

194
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले शाखेचे स्वमालकीच्या जागेत स्थलांतर संपन्न

वेंगुर्ले, ता. १८ : सन १९६४ साली स्थापना झालेल्या सिंधुदुर्ग बँकेने सर्वसामान्य कुटुंब सावरण्याचे काम केले आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांसह सर्वांना फायदेशीर अशा विविध योजना राबविल्या जात आहेत. सध्या ग्राहकांसाठी वीमा योजना हि नवीन योजना आणली आहे. दरम्यान वेंगुर्लेत बँकेची व्याप्ती वाढविण्याची जबाबदारी आता संचालकांची असून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या योजनांचा सर्वांनी फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांनी वेंगुर्ले येथे केले.
वेंगुर्ले-दाभोली नाका येथील बी.पी.डेव्हलपर्स अ‍ॅण्ड बिल्डर्स यांच्या लता अपार्टमेंट या इमारतीमध्ये जिल्हा बँकेची वेंगुर्ले शाखा आज पासून स्वमालकीच्या जागेत सुरु करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन सतिश सावंत व नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते झाले. यावेळी पंचायत समिती सभापती सुनिल मोरजकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष एम.के.गावडे, वेंगुर्ले ग्रुप विकास सोसायटीचे अध्यक्ष अनंत घाडी, जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा परब, संचालक राजन गावडे, नगरसेविका शितल आंगचेकर, जिल्हापरिषद सदस्य दादा कुबल, वसंत तांडेल, बाबली वायंगणकर, आत्माराम ओटवणेकर, प्रकाश मोर्ये, कुंदा पै, का.हु.शेख, वेंगुर्ले शाखा व्यवस्थापक शामसुंदर मेस्त्री, तालुका विकास अधिकारी भागेश बागायतकर, माजी शाखा व्यवस्थापक दिलीप चव्हाण, सर्व संस्थांचे अध्यक्ष तसेच बाबुराव परब, विजय नाईक, दादा सारंग आदींसह शाखेचे कर्मचारी, नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बागायतकर व आभार जिल्हा बँकेचे सीईओ अनिरुद्ध देसाई यांनी मानले.

\