राजू मसूरकर यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे मागणी
सावंतवाडी, ता. 18 ः जिल्ह्यासह राज्यात पावसात वृक्ष पडून, इमारतींना आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शिक्षण व वृक्षकराप्रमाणे घरपट्टीमध्ये विमाकर आकारून आपत्कालीन परिस्थितीत जनतेला दिलासा देण्यात यावा अशी मागणी येथील जीवनरक्षा वैद्यकिय ट्रस्टचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजू मसूरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
याबाबत त्यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. यात विमा कंपनीकडून 263 रुपयांमध्ये इमारतीचा विमा उतरविण्यास कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास इमला मालकांना 4 लाखापर्यंत नुकसान भरपाई मिळते. परंतू शासनाकडून साडे सात हजार रुपये देवून संबंधिताची बोलवण केली जाते. त्यामुळे शासनाच्यावतीने इमारती व मालमत्तेचा विमा उतरविण्यासाठी प्रयत्न केले जावेत असे या निवेदनात म्हटले आहे.