‘त्या’ चोरट्यांचे रेखाचित्र जारी

2

अज्ञात चोरट्यांने नाधवडे, लोरे येथील महिलेच्या गळ्यातील लांबविले होते दागिने

वैभववाडी, ता. १८ : शुक्रवारी भरदिवसा लोरे नं.२ सुतारवाडी व नाधवडे नवलादेवी येथे महिलांचे दागीने घेऊन पलायन करणाऱ्या अनोळखी चोरट्या विरोधात वैभववाडी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. फिर्यादी व साक्षिदार यांनी केलेल्या वर्णनावरुन त्याचे रेखाचिञ प्रसिध्द करण्यात आले आहे.वैभववाडी पोलिस या चोरट्याचा कसून शोध घेत असून त्यासाठी पोलिसांची तीन पथके कामाला लागली आहेत.
शुक्रवारी दुपारी लोरे नं.२ येथील टी.स्टाॕलच्या मालक श्रीमती सुतार यांच्या स्टाॕलवर अनोळखी मोटारसायकल स्वार आला.त्यांने वडापाव घेतला.तसेच सावंतवाडी कुडाळला कसे जाता येईल याबाबत विचारणा केली.सुतार यांची नजर चुकवून चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूञ व चैन काही कळायच्या आत खेचून घेत पलायण केले.तर त्यानंतर अर्ध्या तासांने नाधवडे नवलादेवीवाडीतील प्रमिला परब यांच्या घरात मिटर रीडींग घेण्याच्या बाहाण्याने प्रवेश केलला.तसेच त्यांना शस्ञाचा धाक दाखवत हातातील बांगड्या व गळ्यातील मंगळसूञ घेऊन पलायण केले.
एकाच दिवशी अर्ध्या तासाच्या फरकाने या चोरीच्या घटना अगदी भरवस्तीत घडल्यामुळे नागरीकांमध्ये भित्तीचे वातावरण आहे.महिनाभरापूर्वी कोकिसरे बांधवाडी येथे वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूञ अज्ञात चोरट्याने हिसकावून नेले होते.तर तळेरे येथे एका महिलेच्या हातातील पर्स घेऊन पलायण केले होते.त्या संशयीताचे सुध्दा रेखाचिञ तयार करण्यात आले होते.माञ तोही पोलिसांच्या हाती अदयाप लागलेला नाही.या सराईत चोरट्यांना जेरबंद करणे पोलिसांसमोर मोठे आवाहन आहे.
रेखाचिञातील संशयीत व्यक्ती कोणाला आढळल्यास वैभववाडी पो.नि.दत्ताञय बाकारे 8975765705 व उपनिरीक्षक शेणवी 8600399232 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वैभववाडी पोलिसांकडून करण्यात आले आहे.

5

4