म्हाडाच्या कायदेविषयक सल्लागारपदी स्वप्नील प्रभूआजगावकर

2

सावंतवाडी, ता. 18 : म्हाडाच्या कायदेविषयक सल्लागारपदी आजगाव येथील स्वप्नील प्रभूआजगावकर यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. ही निवड म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी केली आहे.
श्री. प्रभूआजगावकर हे गेले अनेक वर्षे वकिलीसह सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांची ही निवड करण्यात आली आहे.

4

4