विविध मागण्यासाठी कोकण रेल्वेच्या विरोधात सावंतवाडीत लाक्षणिक उपोषण सुरू

329
2

सावंतवाडी
कोकण रेल्वेच्या विविध मागण्यांसंदर्भात रेल्वे प्रशासनाला जाग आणण्यासाठी आज येथील मळगाव रेल्वे स्टेशनच्या समोर कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने आज सकाळपासून लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले यावेळी जोपर्यंत प्रवाशांच्या मागण्यांकडे प्रशासन लक्ष देत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनाची भूमिका कायम ठेवू असा इशारा देण्यात आला दरम्यान हे आंदोलन सायंकाळी उशिरापर्यंत चालणार आहे या आंदोलनाला सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे यात शिवसेना भाजप महाराष्ट्र स्वाभिमान काँग्रेस व राष्ट्रवादी या सर्व पक्षांचा समावेश आहे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष डी के सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे.
यावेळी माजी आमदार राजन तेली, नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी जिल्हा परिषद रेश्मा सावंत, अक्रम खान,नगरसेवक बाबू कुडतरकर, अफरोज राजगुरू, नकुल पार्सेकर, प्रमोद गावडे,संजय तानावडे,राजू कासकर, इफ्तिकार राजगुर,जिल्हा परिषद सदस्य उत्तम पांढरे, गणेशप्रसाद पेडणेकर,कल्पना बांदेकर, बाळा जाधव, अन्वर खान ,राजू परब, चंद्रकांत गावडे,नागेश गावडे, अजय तानावडे ,संजू कानसे ,संदीप आंगचेकर,भाई देऊलकर,अशोक देसाई, विनोद रेडकर,आर.डी. बांदेकर, आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

4