सावंतवाडी ता.१९: अर्चना फाउंडेशन आणि अजब प्रकाशन यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला भव्य पुस्तक प्रदर्शन व माफक दरात विक्री हा उपक्रम कौतुकास्पद आहे,आणि तो सावंतवाडी सारख्या सुंदर नगरीत होतोय हे सावंतवाडीकरांचे भाग्य आहे.असे प्रतिपादन येथील संस्थांच्या राणीसरकार शुभदादेवी भोसले यांनी आज येथे केले.येथील भोसले उद्यानात आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाचा शुभारंभ सौ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर,उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर,अजब प्रकाशन चे प्रमुख मनोज साळुंखे,अर्चना फाऊंडेशनच्या प्रमुख अर्चना घारे,संदीप घारे,नकुल पार्सेकर,रविकिरण तोरस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सौ घारे म्हणाल्या काहीना वाचनाची गोडी असते.मात्र कोकणात सगळ्यांचीच आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे अशा वाचन प्रेमींना महागडी पुस्तके विकत घेता येत नाहीत,अशा वाचकांसाठी हे पुस्तक प्रदर्शन आहे,या पुस्तक प्रदर्शनाच्या माध्यमातून विविध विषयावर आधारित ५०० हुन अधिक पुस्तके उपलब्ध करून देण्यात आले आहेत.तर ७०० रुपया पर्यंतच्या पुस्तकांची विक्री ७० रुपयात होणार आहे.त्यामुळे येथील नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी या पुस्तक प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सौ.घारे यांनी केले.दोडामार्ग व वेंगुर्ला येथे सुद्धा हे पुस्तक प्रदर्शन सुरू होणार आहे.त्याचे उद्घाटन २१ मे रोजी होणार आहे असेही त्यांनी सांगितले.
_________________________________