वस्तीत येण्यापासून रोखण्यासाठी घेतला निर्णय…
? सावंतवाडी ता.३०: नरेंद्र डोंगर परिसरात असलेल्या गव्याच्या कळपाला पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे तो कळप भरवस्तीसह अन्य ठिकाणी फिरत असल्याचे निष्कर्ष वनविभागाने काढला आहे.त्यामुळे भरवस्तीत येणारे गवे जंगलातच राहावेत यासाठी डोंगराच्या परिसरात चार कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले असून त्याठिकाणी खास टँकरने पाणीपुरवठा करणार आला आहे.अशी माहिती सावंतवाडी वनविभागाचे वनक्षेत्रपाल गजानन पानपट्टे यांनी दिली.
गेले काही दिवस डोंगराच्या परिसरात असलेला गव्यांचा कळप अनेकांना दिसला होता.त्यानंतर डोंगराच्या खाली असलेल्या एका शौचालयाच्या टाकीत एक गवा पडला होता.त्याला वाचविण्यात यश आले होते.दोन दिवसापूर्वी नियोजित झाराप-पत्रादेवी महामार्गावर गव्याच्या कळपाला कार आदळून बांदा येथील मोरे कुटुंब गंभीर जखमी झाले होते.या सर्व घटना ताज्या असताना वनविभागाचे अधिकारी श्री.पानपट्टे यांनी निष्कर्ष काढला यात नरेंद्र डोंगरावर असलेले पाणवठे सुकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.त्यामुळे त्यांनी ते पाणवठे पुनर्जीवित करण्या बरोबर आणखी चार पाणवठे तयार केले आहे. व त्या ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे गव्या समवेत अन्य प्राण्यांना सुद्धा पाणी मिळेल असा त्यांचा विश्वास आहे.पाण्याची सुविधा जंगलातच झाल्याने गवे वस्तीकडे येणार नाही असा दावा त्यांनी दिला आहे.