2
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
वनविभागाने ताब्यात घेवून नैसर्गिक अधिवासात सोडले
वेंगुर्ला ता,२०: तालुक्यातील तिरोडा फोलकरवाडी येथील नाना सावंत यांच्या विहिरीत तब्बल पाच फुटाची मगर आढळून आली.हा प्रकार आज उघड झाला.मगर दिसतात ग्रामस्थांनी वन विभागाच्या मदतीने तिला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.
विहीर नदीच्याकाठी असल्यामुळे मगरीचे पिल्लू त्याठिकाणी आले असावे व विहिरीतच त्याची वाढ झाली असावी असा अंदाज ग्रामस्थ वनविभागाकडून वर्तविण्यात येत आहे. दरम्यान मगरीला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. अखेर दोरीच्या साह्याने मगरीला बांधून नैसर्गिक अधिवासात सोडले.
याबाबत वनविभागाशी संपर्क साधला असता या प्रकाराबाबत बाबत त्यांनी दुजोरा दिला आहे. त्या मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले असे वनअधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.
4