अपघातानंतर प्रकार:चालकाला मारहाण, ग्रामस्थांच्या अंगावर गेले धावून…
आंबोली ता, २१: कार आणि डंपर यांच्यात झालेल्या अपघातानंतर पुणे येथील पर्यटकांच्या जमावाने सावंतवाडी येथील कारीवडे भागातील डंपर चालकाला मारहाण केली.यात शिवा राठोड हा डंपर चालक मारहाणीत तर गाडीतील एक लहान मुलगी अपघातात किरकोळ जखमी झाली आहे.हा प्रकार आज सकाळी सात वाजता दाणोली नानापाणी येथील वळणावर घडला.
दरम्यान मारहाण करून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पर्यटकांना सावंतवाडी माजगाव येथे अडविण्यात आले.त्या ठीकाणी त्यांनी ग्रामस्थांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला.यावेळी आपल्याला डंपर चालकाकडुन मारहाण करण्यात आली अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
याप्रकरणी दोघांनी एकमेकाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी सावंतवाडी पोलिसांत धाव घेतली आहे.दोघांनी एकमेकांना मारहाण केल्याचा आरोप केला आहे.त्यानुसार सावंतवाडी पोलीस पुढील तपास करीत आहे.
_____________________________