मालवण ता, २१: बेकायदा मच्छीमारी रोखण्यासाठी आमदार नितेश राणे यांच्याकडून आज सिंधुदुर्ग जिल्हा मत्स्य विभागाला गस्तीनौका प्रदान करण्यात येणार आहे. श्री. राणे यांच्या स्वखर्चातून ही नौका देण्यात येणार आहे.
आज येथे होणार्या मच्छीमार एल्गार मेळाव्यात या नौकेचे वितरण होणार आहे. यावेळी खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह सतीश सावंत, मंदार केणी, दत्ता सामंत, अशोक तोडणकर, लिलाधर पराडकर, छोटू सावजी, दाजी सावजी, शेखर तोडणकर, भाऊ मोरजी आदी उपस्थित राहणार आहेत. बेकायदा मच्छीमारी रोखण्यासाठी नितेश राणे यांनी मत्स्य विभागाला ही नौका देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार या नौकेचे आज वितरण करण्यात येणार आहे.