Wednesday, December 4, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामाकडतापाचा बंदोबस्त करण्यासाठी माकडांना पकडा

माकडतापाचा बंदोबस्त करण्यासाठी माकडांना पकडा

राजू मसूरकर : अर्थराज्यमंत्री केसरकरांनी तरतूद करावी

सावंतवाडी, ता. 21 : सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्याला भेडसावणार्‍या माकडतापाच्या आजाराला हद्दपार करण्यासाठी दोन्ही तालुक्यात स्थिरावलेल्या माकडांचा योग्यतो बंदोबस्त करण्यात यावा. यासाठी आवश्यक असलेली निधीची तरतूद पालकमंत्री तथा अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी करावी अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजू मसूरकर यांनी निवेदनाव्दारे दिली आहे.
ते म्हणाले, जिल्ह्यात सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील ओटवणे, भालावल, कोनशी, नेतर्डे, डोंगरपाल आदी परिसरात गेले काही दिवस माकडतापाने थैमान घातले आहे. अनेक रुग्ण दगावले आहेत तर शेकडो रुग्ण मरणाच्या दारातून परत आले आहेत. हा सर्व प्रकार लक्षात घेता हृदय पिळवटून टाकणारा आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री श्री. केसरकर यांनी माकडे पकडण्याची मोहिम राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यासाठी आवश्यक असलेला निधी आपल्या खात्याकडून उपलब्ध करून द्यावा.
श्री. मसूरकर पुढे म्हणाले, मी सावंतवाडी पालिकेत नगरसेवक असताना अशाचप्रकारे माकडाचा उपद्रव वाढला होता. त्यावेळी मी आवाज उठविल्यानंतर तत्कालीन नगराध्यक्ष असलेल्या श्री. केसरकर यांनी आजर्‍यातून माकड पकडणारे पथक बोलविली होती. त्यावेळी चारशे ते पाचशे माकड पकडण्यात आले होते. तोच प्रयोग पुन्हा राबविण्यात यावा असे या निवेदनात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments