वेंगुर्ले येथे अर्चना फाऊंडेशनच्या पुस्तक प्रदर्शनाचा शुभारंभ…

2

पालकांनी मुलांना वाचनाकडे वळवावे; विलास देऊलकर…

वेंगुर्ला ता.२१: पुस्तक हे गुरूंचे गुरू असुन बुद्धी वाढवण्याचे प्रमुख साधन आहे.आताच्या युवा पिढीतील वाचन संस्कृती लुप्त होत चालली असून पालकांनी मुलांना वाचनाकडे वळवण्यासाठी प्रयत्न करावेत.वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान देणारी असंख्य पुस्तके अर्चना फाउंडेशन माफक दारात उपलब्ध करून देत आहे.हा स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देउलकर यांनी वेंगुर्ला येथे केले.
पुणे जिल्हा बँक उपाध्यक्षा अर्चना घारे-परब संचलित अर्चना फाउंडेशन आणि अजब प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने
वेंगुर्ला नगरवाचनालय येथे आयोजित भव्य मराठी पुस्तक प्रदर्शनाचं उद्घाटन वेंगुर्ला खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देउलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी अर्चना फाउंडेशनच्या संचालिका अर्चना घारे-परब, संदीप घारे, नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी नगराध्यक्ष नम्रता कुबल, नगरवाचनालय अध्यक्ष देवदत्त परुळेकर, लेखिका वृंदा कांबळी, संजय गावडे, नंदन वेंगुर्लेकर, इर्शाद शेख, डॉ लिंगवत, सरोज परब, डॉ उबाळे, प्रदीप कुबल, रघुनाथ परब, आदी मान्यवर आणि पुस्तक प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांचे अर्चना घारे- परब व संदीप घारे यांनी पुस्तक देऊन स्वागत व सत्कार केले.
या प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली असून १०० ते ६००  रुपयांपर्यंतचे पुस्तक या प्रदर्शनात केवळ ७० रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहेत. पुढील आठवडा सकाळी ९ ते रात्री ९ वेळेत पुस्तक प्रदर्शन चालणार आहे. वेंगुर्ला येथे पूर्वीपासून वाचन संस्कृती जोपासली जात असून वेंगुर्ला येथे मोठा वाचक वर्ग असल्याने मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला  प्रतिसाद मिळेल असा विश्वास यावेळी अर्चना घारे- परब यांनी व्यक्त केला. तर तरुण पिढी वाचनाच्या बाबतीत मागे असल्याने अशा प्रकारचे उपक्रम राबवणे महत्वाचे असून पुस्तकांच्या किमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिकाना माफक दरात पुस्तक विक्रीच्या फाउंडेशनच्या या उपक्रमाला वेंगुर्ला येथे  मोठा प्रतिसाद मिळेल से यावेळी नगराध्यक्ष गिरप यांनी सांगितले.

4