ज्येष्ठ चित्रकार प्रकाश कबरे यांचे मुंबईत चित्र प्रदर्शन

2

शिरोडा, ता. २१ :शिरोडा येथील ज्येष्ठ चित्रकार तसेच मुंबई येथील जीएस मेडिकल कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक प्रकाश कबरे यांच्या चित्राचे प्रदर्शन मुंबई येथील जहाँगीर आर्ट गॅलरी येथे होणार आहे. 28 मे ते 3 जून या कालावधीत गॅलरीच्या तळमजल्यावर याचे आयोजन केले आहे. सकाळी अकरा ते सायंकाळी सात या वेळेत लोकांना हे प्रदर्शन पाहण्याची संधी मिळणार आहे. यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन श्री. कबरे यांच्या मित्रपरिवाराकडून करण्यात आले आहे.

1

4