राजे खेमसावंत यांची पत्रकार परिषदेत माहीती…
सावंतवाडी ता.२१: येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाला नॅक समितीच्यावतीने “ए ग्रेड” मानांकन देण्यात आले आहे.याबाबतची माहीती संस्थानचे राजे खेम सावंत यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.यावेळी राणी शुभदादेवी भोसले,युवराज लखन राजे,महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप भारमल आदी उपस्थित होते.
यावेळी श्री.सावंत म्हणाले,आज भावनिक आणी आनंदाचा क्षण आला आहे.रत्नागिरी जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाकडुन गेली अनेक वर्षे ज्ञानदानाचे काम या महाविद्यालयाचे सुरू आहे.आज नॅकच्या स्वरूपात आम्हाला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे.सकाळीच याबाबतची माहीती मेलच्या माध्यमातून मिळाली आहे.यासाठी अनेक वर्षे परिश्रम घ्यावे लागले.संस्थानकालापासुन राजघराण्याकडुन हे महाविदयालयाकडुन चालवले जात आहे.अनेक पिढ्या या ठीकाणी शिकून गेल्या आहेत.त्याचा फायदा निश्चीतच विद्यार्थ्यांना झाला आहे.
यावेळी श्री.भारमल म्हणाले राजघराण्याने महाविद्यालयाकडे लक्ष दील्यामुळेच हे यश मिळू शकले यावेळी मोहन चौगुले,हर्षद राव,देविदास बोर्डे,दीलीप खोडकर,राहुल शेवाळे, विश्वास सोनाळकर,सतिश सावंत,जयप्रकाश सावंत आदी उपस्थित होते.