Tuesday, December 10, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यावैभववाडीत चोरट्यांचा सुळसुळाट

वैभववाडीत चोरट्यांचा सुळसुळाट

चोरट्यांना ‘खाकी’ चा धाक नाही का?’; जनतेमधून पोलिसांच्या कामगिरीबाबत साशंकता

वैभववाडी, ता. २१ : तालुक्यात चोरीचे सत्र सुरूच असून दिवसा ढवळ्या महिलांना बाहेर पडणे मुश्किल बनले आहे. लोरे आणि नाधवडेतील चोरीची घटना ताजी असतानाच येथील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी वसाहतीमधील दोन रुमच्या दरवाज्याच्या कड्या तोडून अज्ञात चोरट्यांने चोरी करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली.
तालुक्यात पाच दिवसापूर्वीच भर दिवसा अज्ञात चोरट्यांने लोरे व नाधवडेत घरात घुसून महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच शनिवारी मध्यरात्री ग्रामीण रूग्णालयातील कर्मचारी वसाहतीत अज्ञात चोरट्यांने दोन रुमच्या कड्या तोडल्या. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. याप्रकरणी वैभववाडी पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments