Monday, November 11, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामहामार्गावरील तरंदळे फाटा येथे अंडरपासला मंजुरी : खासदार विनायक राऊत यांची ग्वाही

महामार्गावरील तरंदळे फाटा येथे अंडरपासला मंजुरी : खासदार विनायक राऊत यांची ग्वाही

जानवली-कलमठ मधील ग्रामस्थांशी चर्चा

कणकवली, ता.21 : मुंबई-गोवा महामार्गावरील जानवली पुलालगत तरंदळे फाटा येथे नागरिकांच्या मागणीनुसार अंडरपास मंजूर करण्यात आला आहे. तर जाणवले गावातील महामार्गालगतचे मारुती मंदिर देखील आम्ही बाधित होऊ देणार नाही अशी ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी आज दिली.
जानवली गावातील प्रकल्पग्रस्त आणि तेथील नागरिकांच्या महामार्ग चौपदरीकरणाबाबतच्या समस्या जाणून घेण्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी आज हायवे अधिकाऱ्यांसह तरंदळे फाटा आणि मारुती मंदिर येथे येऊन जानवली ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार वैभव नाईक, भाजपचे युवा नेते संदेश पारकर, महामार्ग प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी, उपअभियंता अमोल ओटवणेकर यांच्यासह नगरसेवक सुशांत नाईक, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजू शेटये, संदीप सावंत, दामू सावंत, रंजन राणे, भाजपचे परशुराम झगडे, बबली राणे तसेच जानवली आणि कलमठ येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तरंदळे फाटा येथील नागरिकांशी चर्चा केल्यानंतर येथील परिसरात अंडरपास मंजूर केला जाईल अशी ग्वाही खासदार श्री.राऊत यांनी दिली. तर येथील अंडरपासचा प्रस्ताव दिल्ली येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी आणि उपअभियंता अमोल ओटवणेकर यांनी दिली. यानंतर जानवलीतील प्रकल्पग्रस्तांशी मारूती मंदिर येथे खासदार श्री.राऊत यांनी चर्चा केली.  या चर्चेनंतर त्यांनी येथील मारूती मंदिर आम्ही कोणत्याही परिस्थितीत बाधित होऊ देणार नसल्याची ग्वाही दिली.
दरम्यान जानवलीतील नागरिकांच्या चर्चेवेळी नागरिकांकडून अनेक मुद्दे उपस्थित झाले. यात संदीप सावंत यांनी तरंदळे फाटा येथे सर्कल करा तर साकेडी फाटा येथे अंडरपास करा अशी मागणी केली. तर रंजन राणे यांनी हायवेची हद्द सतत बदलत आहे. त्यामुळे मंदिरासह अनेक नागरिकांची घरे आणि बागायती बाधित होत असल्याचा मुद्दा मांडला. यानंतर खासदार श्री.राऊत यांनी कोणत्याही नव्या मागण्या मान्य होणार नाहीत. तरंदळे फाटा येथे अंडरपास आणि मारूती मंदिर विस्थापित न होऊ देणे या दोनच मागण्या मंजूर होतील अशी ग्वाही दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments