मालवण-हडी खाडीपात्रात बुडालेल्या मुलाचा मृतदेह सापडला…

2

 

मालवण ता.२१: येथील हडी खाडीपात्रात सोमवारी सायंकाळी बुडून बेपत्ता झालेल्या हडी-कोतेवाडा येथील साईकिरण राजेंद्र तोंडवळकर (वय १६) या शाळकरी मुलाचा मृतदेह आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हडी ग्रामस्थांना आढळून आला.त्याच्या अकाली निधनाने हडी गावात शोककाळ पसरली आहे.
सुट्टीत मौज मजा करण्यासाठी आलेला साईकिरण ७-८ मित्रांसमवेत हडी खाडीपत्रात गेला होता.दरम्यान तो बुडल्याची घटना घडली होती.बुडाल्यानंतर तो बेपत्ता असल्याने मालवण येथील ओम शिव मोरेश्वर स्कूबा डायव्हिंग या पथकाच्या माध्यमातून त्याचा शोध घेण्याचे कार्य सुरू होते.दरम्यान आज त्याचा मृतदेह आढळून आला.
त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, काका, काकी, असा परिवार आहे.शिवसेना पदाधिकारी पूजा तोंडवळकर यांचा तो मुलगा होय.

4