जिल्हा बँकेच्या मदतीने सातवी गाडी दुष्काळी भागाकडे रवाना

2

सावंतवाडी, ता. 21 ः माजी सभापती तळवणेकर यांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील कवठेमहाकाळ तालुक्यातील दुष्काळग्रस्तांसाठी सातवी चार्‍याची गाडी आज मार्गस्थ करण्यात आली.
यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक व बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी पुढाकार घेतला. यावेळी डॉ. राजेशकुमार गुप्ता, सावंतवाडी वनक्षेत्रपाल गजानन पानपट्टे, देवया सुर्याजी, प्रथमेश प्रभू, भगवान गुरव, विजय राऊत, समिर शेख, बाबू वरक, रमाकांत मल्हार, लक्ष्मण देऊलकर आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. तळवणेकर म्हणाले,आपल्याकडून आवाहन केल्यानंतर त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. चारा जमा झाला आहे. परंतू गाडीचा खर्च परवडत नसल्यामुळे जास्त गाड्या पाठविणे शक्य नाही. आम्ही केलेल्या संकल्पानुसार दहा गाड्या पाठविणार आहोत. मात्र अन्य गाड्या पाठविण्यासाठी कुणी इच्छुक असल्यास आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन तळवणेकर यांनी केले आहे.

4