मोटरसायकल अपघातातील जखमी तरुणाचा मृत्यू

589
2
Google search engine
Google search engine
Google search engine

आरे फाटा येथे झाला होता अपघात

कणकवली, ता.२१ : आरे फाटा (ता.देवगड) येथे कारच्या धडकेत जखमी झालेल्या मोटरसायकलवरील तरुणाचा आज सकाळी कणकवलीत उपचार सुरू असताना मृत्यू झाला. नवनीत सखाराम रासम (वय २७, रा.हरकुळ बुद्रुक) असे त्याचे नाव आहे.
१९ मे रोजी तळवडे येथे विवाह सोहळ्यासाठी नवनीत आणि त्याचा मित्र सागर परब हे मोटरसायकलवरून कणकवली ते तळवडे असे आले होते. विवाह सोहळा झाल्यानंतर दोघेही मोटरसायकलवरून परतत असताना देवगड-नांदगाव रस्त्यावरील आरे फाटा येथे समोरून येणाऱ्या कारची धडक बसून त्यांच्या मोटरसायकलला अपघात झाला. यात अपघातात नवनीत हा गंभीर जखमी झाला होता. तर सागरला ही दुखापत झाली होती या दोघांवर कणकवलीत खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. नवनीत याच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी 6.30 च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

\