पूर्व उच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अर्जुन रावराणे विद्यालयाला घवघवीत यश

207
2

वैभववाडी,ता, २२: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत पूर्व उच्च प्राथमिक ( इयत्ता-पाचवी) व माध्यमिक (इयत्ता-८ वी) शिष्यवृत्ती परीक्षेचे फेब्रवारी २०१९ मध्ये आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेसाठी तालुक्यातून अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. २९६ गुणाच्या या परीक्षेत अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
यामध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवी मधील कु. आयुष अविनाश आंधळे याने २७४ गुण प्राप्त केले. तसेच कु वेदिका विवेकानंद कडू २६४ गुण, कु. विद्या अनंत बांगर २४२ गुण, कु.मानसी अरविंद चव्हाण १८२ गुण, कु. यश अशोक पाटील १७८ गुण, कु. पियूष रविंद्र चव्हाण १७० गुण, कु. प्रिती नितिन रावराणे १६६ गुण, कु. सार्थक सुशांत पुरळकर१४२ गुण, कु. सिद्धेश्वर शंकर वाघमोडे १२६ गुण संपादन केले. तसेच उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कु. सृष्टी लक्ष्मण हांडे हिने २८८ पैकी २०४ गुण मिळवून यश संपादन केले. या विद्यार्थ्यांना श्रीम. ए. जी केळकर, श्रीम. एस एस पाटील, श्रीम. पी पी सावंत, श्रीम. जे.एस. बोडेकर, श्रीम. एस. ए. सबनीस श्रीम. पी. एन. भोवड, वर्गशिक्षक श्री. एम.एस. चोरगे, बाह्य परीक्षा प्रमुख श्री. पी. बी. पवार यांनी मार्गदर्शन केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या सर्वांचे वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई चे अधिक्षक श्री. जयेंद्र रावराणे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. बी. एस. नादकर, ज्येष्ठ शिक्षक श्री. एस. बी. शिंदे यांनी अभिनंदन केले. व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

4