विनायक राऊत की निलेश राणे…

2

उद्या निकाल : कोण बाजी मारणार याकडे मतदारांचे लक्ष

सावंतवाडी / अमोल टेंबकर, ता. 22 : एक्झिट पोलच्या अंदाजावरून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील वातावरण ढवळून निघालेले असताना उद्या होणार्‍या मतमोजणीनंतर या मतदार संघाचा खासदार कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
तूर्तास विद्यमान खासदार विनायक राऊत की माजी खासदार निलेश राणे अशी चढाओढ आहे. तर काँग्रेसच्यावतीने रिंगणात असलेले नवीनचंद्र बांदिवडेकर तिसर्‍या क्रमांकावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या लागणारा निकाल धक्कादायक असण्याची शक्यता आहे. काल झालेल्या मालवण येथील एल्गार मेळाव्यात आणखी काही तासात निलेश राणे खासदार होतील असा विश्वास खुद्द महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला असून काही झाले तरी निलेश राणेच निवडून येतील असा त्यांनी दावा केला आहे. तर दुसरीकडे आमदार नितेश राणे यांनी एक्झिट पोलची दखल आम्ही घेत नाही, आमचा विजय निश्चित आहे, असे सांगून निलेश राणेंचाच विजय होणार असा विश्वास व्यक्त केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून मात्र कोणीही दावे-प्रतिदावे करताना दिसत नाहीत. विद्यमान खासदार निवडणुकीनंतर शांतच आहेत तर अन्य काही जिल्हास्तरीवरील नेते विनायक राऊत विजयी होतील असा दावा करताना दिसत आहे. त्यामुळे उद्या विजयाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

11

4