Saturday, November 2, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यादोन दुचाकीत भीषण अपघात,एकजण जागीच ठार...

दोन दुचाकीत भीषण अपघात,एकजण जागीच ठार…

वैभववाडी मच्छी मार्केट नजिक घडली घटना; तर एकजण गंभीर जखमी…

वैभववाडी ता.२२: येथील मच्छी मार्केट परिसरात एक्टिवा व प्लेटिना या दोन दुचाकीत समोरासमोर धडक होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाला.हा अपघात आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला.शंकर विठ्ठल बर्गे वय ६२ रा.खांबाळे-धनगरवाडी असे मृत व्यक्तीचे नाव आहे.तर अन्य एक जण यात गंभीर जखमी झाला आहे.त्याला अधिक उपचारासाठी कणकवली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,वैभववाडी फोंडा मार्गावर वैभववाडीहून शंकर बरगे आपल्या प्लॕटीना मोटारसायकवरून खांबाळे येथे जात असताना याचवेळी खांबाळे मोहितेवाडी येथील सचिन पुंडलिक खांडेकर वय ३५ वर्षे आपल्या अॕक्टीव्हा मोटारसायकलवरून वैभववाडी येत असताना येथील मच्छीमार्केट नजिक दोन मोटारसायकलमध्ये जोरदार धडक बसली. या अपघातात शंकर बरगे यांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सचिन खांडेकर गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांना येथील ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील गंभीर जखमी शंकर बरगे मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर सचिन खांडेकर यांना पुढील उपचारासाठी कणकवली येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिसांनी जावून पंचनामा केला आहे.
मयत शंकर बरगे खांबाळे ग्रा. पं. चे विद्यमान सदस्य आहेत. सन २०१७ साली खांबाळे पं. स. मधून त्यांनी निवडणूक लढविली होती. त्यांच्या पश्चात्य पत्नी, दोन मुलगे असा परीवार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments