Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
वाहनांना ये-जा करण्यासाठी अडथळा;पोलीस ठाण्यात नोंद नाही…
सावंतवाडी ता. २३: येथील उपरलकर देवस्थान परिसरातील वळणावर आयशर टेम्पो रस्त्याच्या मधोमध पलटी झाल्याची घटना घडली आहे.हा प्रकार आज सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला. दरम्यान या अपघातानंतर घटनास्थळी कोणीही नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या अपघातात जीवित हानी झाली अथवा नाही याबाबत नागरिकांमध्ये शाशंकता आहे.तर पोलिसांशी संपर्क साधला असता सावंतवाडी पोलीस ठाण्यात याबाबत कोणती खबर देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.मात्र या मार्गावर वाहनांना ये-जा करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे.याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.
Download WordPress Themes Nulled and plugins.