दोडामार्ग, ता. २३ : लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधून खासदार विनायक राऊत सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्यावर दोडामार्ग तालुक्यात सेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष व्यक्त केला. त्यानंतर युतीच्या वतीने विजयी रॅली तालुक्यात काढण्यात आली.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधून लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार विनायक राऊत महाराष्ट्र स्वाभिमानचे डॉ.निलेश राणे आणि काँग्रेसचे नवीन चंद्र बांदिवडेकर अशी तिरंगी लढत झाली. मात्र खरी लढत स्वाभिमान व सेना अशीच होती. या मतदारसंघात काटे की टक्कर होईल असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र सगळे अंदाज निष्प्रभ ठरवीत सेनेचे खासदार विनायक राऊत 1लाख 69 हजार च्या मताधिक्याने विजयी झाले. हा विजयोत्सव तालुक्यातील युतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत साजरा केला. तसेच तालुक्यात विजयी रॅली काढण्यात आली.
यावेळी सेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी कसई-दोडामार्ग नगराध्यक्षा सौ. लीना कुबल , भाजपाचे उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण, गोपाळ गवस, सज्जन धाऊस्कर, विजय जाधव, समिर रेडकर, गिरीश डिचोलकर, मिलिंद नाईक दीपक देसाई, संतोष मोर्य, जि. प. सदस्या संपदा देसाई, पंचायत समिती सदस्य धनश्री गवस, गणेश प्रसाद गवस तिलकाचन गवस संदेश वरक आदी उपस्थित होते.