राणेंनी स्वाभिमान पक्षाचे दुकान बंद करावे : विनायक राऊत

267
2

हेराफेरीचा आरोप म्हणजे द्राक्षे आंबट म्हणण्यासारखे

कणकवली, ता. 23 ः स्वतःच्या पापाचे खापर निवडणूक आयोगावर फोडणार्‍या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या स्वाभिमान पक्षाचे दुकान बंद करावे. त्यांनी केलेल्या हेराफेरीचा आरोप म्हणजे द्राक्षे आंबट असे म्हणण्यासारखे आहे, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी विजयानंतर दिली.
आपल्या पाठिशी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता ठामपणे उभी राहिली. त्यात शिवसेनेचे सर्व नेते आणि मोदींचा करिष्मा असल्याने आपला विजय झाला आहे. त्यामुळे आता माझी जबाबदारी आणखी वाढली आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
श्री. राऊत यांनी विजयानंतर ब्रेकींग मालवणीला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, लोकसभेत मिळालेल्या भरभक्कम विजयामुळे मला आनंद झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींचा करिष्मा यामुळे आपल्याला यश मिळाले. मोदींनी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम केले आहे. त्याचा फायदा या निवडणुकीत आपल्याला झाला. येणार्‍या काळात यापेक्षाही चांगले काम करून जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न असणार आहेत.
श्री. राणे यांनी केलेल्या हेराफेरीच्या आरोपावर त्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, स्वतःच्या पराभवाचे खापर निवडणुक आयोगावर फोडण्यापेक्षा त्यांनी आत्मपरीक्षण करावे. त्यांचा हा आरोप म्हणजे द्राक्षे आंबट म्हणण्यासारखी आहे. त्यामुळे त्यांनी आता नाहक आरोप करण्यापेक्षा आपले स्वाभिमान पक्षाचे दुकान बंद करावे.

4