राज्यातील महाविद्यालये २० ऑक्‍टोबरपासून सुरू होणार..

2

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय; लसीचे दोन डोस पुर्ण असणे आवश्यक…

मुंबई, ता.१३: राज्यातील महाविद्यालये २० ऑक्टोबर पासून सुरू करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

ज्या विद्यार्थ्यांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना तात्काळ वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे, तर ज्यांचे डोस पूर्ण झाले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खास मोहीम राबविण्यात येणार आहे. मात्र महाविद्यालय सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगळी नियमावली लावण्यात आली आहे. तर नेमके कॉलेज सुरू करावे का करु नये याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे देण्यात आलेला आहे. या बाबतची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

331

4