चोरीतील संशयिताची जामिनावर मुक्तता…

2

मालवण, ता. १३ : मसुरेतील एका फार्महाऊसवर मालाच्या विक्रीची रक्कम तसेच दुचाकी चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संशयित आरोपी परेश सातार्डेकर याची आज येथील न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली.
तालुक्यातील मसुरे येथील त्रिवेणी फार्म हाऊसवर परेश सातार्डेकर हा सुपरवायझर म्हणून कामास होता. फार्महाउसचे मालक सचिन सावंत हे मुंबईला गेले असता फार्महाउस वरील फुड प्रोसेसिंग मालाचे विक्रीतून आलेली रोख रक्कम ३० हजार रुपये व होंडा ऍक्टिवा गाडी चोरून नेल्याबाबतची तक्रार येथील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. यातील संशयित आरोपी परेश सातार्डेकर याला पोलिसांनी अटक केल्यावर त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज कोठडीची मुदत संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्याची १५ हजाराच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली. आरोपीतर्फे ॲड. हरेश्वर गरगटे व ॲड. पूजा भोईटे यांनी काम पाहिले.

239

4