मळगाव बाजारपेठेत बेकरीला आग दोन दुकाने जळून खाक….

2

सावंतवाडी/निखील माळकर ता.१४:मळगाव बाजार पेठेत असलेल्या बेकरीला आग लागून दोन दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. तर बाजूला असलेल्या दोन दुकानात आगीची झळ बसली आहे. या आगीत अंदाजे ६० ते ७० लाखाचे नुकसान झाले आहे. हा प्रकार आज पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडला. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा संशय आहे. दरम्यान सावंतवाडी व वेगुर्ले पालिकेचा बंब त्या ठिकाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु अपयश आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, मळगाव बाजारपेठेतील सुजेश नायर यांच्या मॉर्डन बेकरीला अचानक आग लागली.त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सुमारे सकाळी साडेचारच्या सुमारास ही आग लागली. बेकरीतील फ्रिजसह अन्य सर्व सामान जळून खाक झाले आहेत.बेकरीत आग लागल्याचे लक्षात येताच तेथील ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आग मोठी असल्याने सावंतवाडी नगरपंचायत आणि वेगुर्ले नगरपंचायतच्या अग्निशामक बंबाला पाचारण केले होते. त्यानंतर आग विझवण्यात आली. या बेकरीत कोणीही कर्मचारी नसल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

2,046

4