पुर्नवापर करणार ः नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची माहिती
सावंतवाडी, ता. 24 ः कचर्याचा पुर्नवापर करण्याच्या उद्देशाने येथील पालिकेच्यावतीने ई-कचरा जमविण्यासाठी अभियानाला नागरिकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. आज पहिल्याच दिवशी एक गाडी कचरा जमा झाला आहे.
दरम्यान नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी नागरिकांचे आभार मानले असून शहरातील सर्व लोकांनी आपल्याकडचा कचरा पालिकेच्या गाड्यांवर द्यावा असे आवाहन केले आहे. सावंतवाडी पालिकेच्यावतीने नगराध्यक्ष श्री. साळगावकर, बाबू कुडतरकर या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. आज पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात तब्बल एक गाडी कचरा मिळाला आहे. यात टीव्ही, फ्रिज, कॉम्प्युटर यासह कपडे, लाकडी सामान आदींचा समावेश आहे. यावेळी श्री. साळगावकर यांनी ई-कचरा घेवून गाडी आल्यानंतर त्याठिकाणी भेट देवून कौतुक केले. यावेळी आरोग्य विभागाचे दीपक म्हापसेकर, सौ. नाडकर्णी, निलेश तळवडेकर, आकाश सावंत आदी उपस्थित होते.