निवडणुक हरलो तरी विश्वास हरलो नाही : सिद्धेश परब

2

पुन्हा एकदा संघटना बांधण्यासाठी प्रयत्न

वेंगुर्ले, ता. 24 : लोकसभेच्या अपयशाने खचून न जाता आगामी काळात होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करूया असे आवाहन जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सिद्धेश परब यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे. निवडणुक हरलो तरी विश्वास हरलो नाही. आगामी काळात होणार्‍या निवडणुकात आम्ही सकारात्मक राहू. सत्यासाठी आणि जनतेसाठी कायम लढण्याची ताकद आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांना पराभव पत्करावा लागला. या पार्श्वभूमीवर श्री. परब यांनी निवेदनाव्दारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी जरी अपयश आले तरी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी युवकांच्या माध्यमातून प्रयत्न करू असा विश्वास व्यक्त केला आहे.

16

4