तब्बल 20 वर्षानंतर यदा कदाचित रिर्टन

166
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कुडाळ, सावंतवाडीत आयोजन : रसिकांवर बरसणार हास्याचा पाऊस

कुडाळ, ता. 24 : तब्बल 20 वर्षानंतर पुन्हा एकदा मराठी रंगभूमीवर श्रीदत्तविजय प्रॉडक्शन निर्मित यदा कदाचित रिर्टन हे विनोदी नाटक अवतरणार आहे. या नाटकाचे प्रयोग 31 मे रोजी बाबा वर्दम थिएटर्स कुडाळ तर 1 जून रोजी सावंतवाडीतील बॅ. नाथ पै सभागृहात सादर होणार आहेत.


या नाटकाच्या माध्यमातून लेखक तथा दिग्दर्शक संतोष पवार यांची नव्या दमाची टीम पुन्हा एकदा रंगभूमीवर हास्याचा धुमाकुळ घालणार आहे. या नाटकाच्या कुडाळ येथील प्रयोगासाठीची तिकीट विक्री बस स्थानकासमोरील अदिती सायबर कॅफे तर सावंतवाडीतील प्रयोगासाठी राजश्री फोटो स्टुडीओ येथे 29 मे पासून सुरू होणार आहे. यासाठी 300, 250, 200 रुपये असे तिकीट दर ठेवण्यात आले आहेत. तरी कुडाळ, सावंतवाडीसह जिल्ह्यातील नाट्यरसिकांनी या नाटकाचा लाभ घ्यावा तसेच या नाटकाच्या प्रयोगासाठी व अधिक माहितीसाठी 9823177201, 8380989366 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नागेश नेमळेकर यांनी केले आहे.

\