ग्लोबल मालवणी संस्थे तर्फे मालवण येथे स्वस्त दरात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

125
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी, ता.२४: निरोगी आयुष्यासाठी साधारण वय वर्ष ४० नंतर काही प्राथमिक तपासण्या करणे आवश्यक असतात. परंतु महागड्या वैद्यकीय तपासणी खर्चामुळे आपण ह्या तपासण्या करून घेणे टाळतो. यासाठी ग्लोबल मालवणी संस्था आणि सत्यमेव जयते ल्याब यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य तपासणी शिबीर ग्लोबल मालवणी पॉलिक्लिनिक, नागेश्वर पार्क, बांगीवाडा, मालवण येथे १७ मे  आणि १८ मे रोजी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात जवळजवळ  ५०० ते ६०० रुपयाच्या तपासण्या अर्ध्या किमतीत म्हणजे फक्त २५० रुपयात करण्यात आल्या. यामध्ये कोलेस्टेरॉल, फास्टिंग आणि पीपी ब्लड शुगर, युरिक ऍसिड इत्यादी तपासण्या करण्यात आल्या. तसेच रिपोर्ट मिळाल्यानंतर ह्रिदयरोग आणि मधुमेह तज्ज्ञांकडून रुग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ६० हुन अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी परिचारिका म्हणून अमृता परब, धनश्री दळवी, सना बांगी, योगिता देऊलकर आणि ग्लोबल मालवणी संस्थेचे निलेश वालकर, गोविंद केरकर, प्रशांत पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.

\