प्राथमिक शिक्षक संघ शाखा वेंगुर्ले महिला सेल कार्यकारणी जाहीर

2

तालुकाध्यक्ष पदी अर्चना तांडेल यांची निवड

 

वेंगुर्ला, ता. २४ : अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा वेंगुर्लेची महिला सेलची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये तालुकाध्यक्ष पदी अर्चना वैभव तांडेल, सरचिटणीस पदी अनिशा अनंत झोरे, कार्याध्यक्षपदी मनाली मंगेश कांबळी, कोषाध्यक्ष ज्योती सावंत तर उपाध्यक्षपदी आस्था फोंडेकर यांची निवड करण्यात आली आहे. पुढील तीन वर्षासाठी हि कार्यकारणी काम करणार आहे.
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ ही जागतिक शिक्षक संघाशी संलग्न असलेली राष्ट्रीय शिक्षक संघटना आहे. शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी संघर्ष करत असतानाच देशातील महिला कर्मचारी यांचे प्रश्न स्वतंत्ररित्या हाताळता यावेत. यासाठी संघटनेच्या महिला सेलची स्थापना करण्यात आली आहे. या सेलचे कार्य तालुका स्तरापासून जागतिक स्तरापर्यंत चालते. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा सुलभाताई दोंदे  यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील महिला शिक्षकांसाठी स्वतंत्र सेल असलेली ही एकमेव प्राथमिक शिक्षक संघटना आहे. वूमन्स नेटवर्कच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठी संघटनेचे प्रयत्न सुरू आहेत. संघटना देशातील महिला शिक्षक कर्मचाऱ्यांचे आतापर्यंत अनेक प्रश्न सोडवत आली आहे. स्थानिक पातळीवर महिला शिक्षक कर्मचाºयांना अनेक प्रश्नांना व समस्यांना सामोरे जावे लागते. बहुतांश महिला कर्मचारी अनेक समस्या निमुटपणे सहन करत असतात. असे प्रश्न नारी शक्तीच्या एकजूटितून संघटितपणे सोडविण्यासाठी वेंगुर्ले तालुका महिला सेल कार्यकारणी निवडण्यात आली आहे. या कार्यकारणीमध्ये सदस्य म्हणून अर्चना रेडकर, नेत्रा नवार, शितल गावडे, संजीवनी ढास, शितल गोसावी, संचिता सावंत, पंचफुला मोरे, सरोज नाईक, निवेदिता चव्हाण, सुनिता आजगावकर संचिता परब, वृषाली मोहिते, तन्वी बांदिवडेकर, दिपमाला जाधव, उज्वला गोडसे,रसिका घोलेकर, श्यामल मांजरेकर या काम पहातील. अखिल भारतीय महिला सेलच्या माध्यमातून तालुक्यातील महिलां शिक्षकांनी संघटीत व्हावे. असे आवाहन तालुका महिला सेल च्या नूतन कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.

9

4