“कमविण्यास शिका” पुस्तकाचे सावंतवाडीत प्रकाशन…

2

सावंतवाडी, ता.१७ : येथील कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या परूळकर सभागृहात मंगळवारी कै. दिनेश पांगम यांच्या “कमविण्यास शिका” या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित केला आहे.”लर्न टू अर्न” या मूळ इंग्रजी सुप्रसिद्ध पुस्तकाचं भाषांतर असलेल्या कमाविण्यास शिका या पुस्तकाचे लिखाण श्री.पांगम यांनी लॉकडाऊन काळात केले.
त्या पुस्तकाचे प्रकाशन व्हावे, हि त्यांची इच्छा होती. मात्र अचानक त्यांचे निधन झाले. त्यांची अधुरी इच्छा पूणँ करण्याचा संकल्प पांगम कुटूंबियांनी केला. त्याला कळसुलकर इंग्लिश माजी विद्यार्थी संघाने साथ दिली. वेंगुर्लेतील किरात ट्रस्ट ने पुस्तकाचे मुद्रण केले. आता या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थी संघाने सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने आयोजित केला आहे.
प्रख्यात भाषांतरकार लेखिका, महिला व बालविकास क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्या वंदना करंबेळकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी डॉ.त्र्यंबक गणेश लेले हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
श्री. पांगम यांनी “लर्न टू अर्न” या Peter Lynch & Rothchild ह्या लेखकांच्या पुस्तकाचा कमविण्यास शिका हा अनुवाद स्टाॅक एक्सचेंजच्या मार्फत पैसे कसे कमवाल, ह्या नावाने त्यांच्या मृत्यु पुर्वी काहीच दिवस आधी केलेला होता. श्री.पांगम यांचे माजी विद्यार्थी संघातही योगदान होते, ही एक प्रकारे त्यांना श्रध्दांजली असल्याचे माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष द.म.गोठोस्कर यांनी सांगितले. सवँ माजी विद्यार्थी, साहित्य, अथँ क्षेत्रातील रुची असलेल्या सवाँनी उपस्थित राहाण्याचे आवाहन माजी विद्यार्थी संघाने केले आहे.

166

4