विनायक राऊत यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान द्यावे

199
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दीपक केसरकर ः युतीच्या पक्षश्रेष्ठींकडे मागणी करणार

सावंतवाडी, ता. 24 ः खासदार विनायक राऊत यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळावे अशी मागणी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठींकडे करणार आहोत असे मत पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत मांडले.
दरम्यान कोकणची जनता ही सुज्ञ आहे. त्यामुळे राणे कुटुंबियांकडून आमच्यावर टोकाचे आरोप झाले असले तरी येथील जनता आमच्या पाठिशी ठामपणे उभी राहिली. मताधिक्य घटविण्याची भाषा करणार्‍या विरोधकांना येथील जनतेने जागा दाखवून दिली, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
श्री. केसरकर यांनी आज येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, युवानेते संदेश पारकर, शैलेश परब, विक्रांत सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सर्व पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत खासदार राऊत यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी श्री. केसरकर म्हणाले, सर्व अंदाज फोल ठरवून राऊत भरघोस मतांनी निवडून आले आहे. जिल्ह्यात असलेला दहशतवाद मिटविण्याचे काम मागच्या निवडणुकीत राऊत यांनी केले होते. यासुद्धा निवडणुकीत त्यांच्या पाठिशी येथील जनता ठामपणे उभी राहिली. विरोधकांकडून खालच्या दर्जाची टीका करण्यात आली. परंतू ती मतदारांनी मान्य केली नाही. त्यांच्या या विजयामुळे येणार्‍या काळात त्यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान द्यावे अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे करण्यात येणार आहे.

\