Saturday, January 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकाथ्यातून क्रांती घडविण्यासाठी जिल्ह्यात क्वॉयर मॉडेल विकसीत

काथ्यातून क्रांती घडविण्यासाठी जिल्ह्यात क्वॉयर मॉडेल विकसीत

दिपक केसरकर ः माजगाव-उद्यमनगर येथे ब्लू डेल्टा कंपनीचा शुभारंभ

सावंतवाडी, ता. 25 ः जिल्ह्यात काथ्याच्या माध्यमातून भविष्यात क्रांती घडविण्याचा मानस आहे. त्यासाठी क्वॉयर मॉडेल विकसीत करून सावंतवाडीतील एक हजारहून अधिक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असा विश्वास गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केला.


माजगाव येथे धरण प्रकल्प मंजूर आहे. त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्याचा फायदा माजगाव उद्यमनगरसोबत पंचक्रोशीला होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. माजगाव-उद्यमनगर येथे ब्लू डेल्टा या कंपनीचा शुभारंभ करण्यात आला. या कंपनीच्या माध्यमातून काथ्यावर, काजूवर प्रक्रिया करणारी विविध यंत्रसामुग्री तयार करण्यात येणार आहे. या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजगाव सरपंच दिनेश सावंत, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. केसरकर म्हणाले, माजगाव-उद्यमनगराचा येत्या काळात विकास करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अन्य एमआयडीसीच्या तुलनेत येथील उद्योग आजही सुरू आहेत ही कौतुकाची बाब आहे. त्यामुळे येणार्‍या काळात रस्ते, पाणी, वीज आणि विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
या कंपनीच्या माध्यमातून तयार केल्या जाणार्‍या यंत्रसामुग्रीचा उद्योजकांनी रोजगारासाठी उपयोग करून घ्यावा. सध्या काथ्या व्यवसायातसुद्धा मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यासाठी काथ्या न जाळता तो कंपनीकडे पाठविला तर नवी काथ्या चळवळ उभी राहू शकते. या काथ्या उत्पादनाच्या विक्रीसाठी केरळ येथील एका आंतरराष्ट्रीय कंपनीशी आपले बोलणे सुरू आहे, असेही यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments